जिओला २ वर्ष पूर्ण ; १०० रुपयांमध्ये ‘ही’ भन्नाट ऑफर

रायगड माझा वृत्त 

२ वर्षापूर्वी टेलिकॉम मार्केटमध्ये पदार्पण करुन रिलायन्स जिओने स्पर्धक कंपन्यांना हादरवून टाकले होते. मोफत इंटरनेट, मग स्वस्तातील मोबाईल आणि त्यानंतर एकाहून एक ऑफर्स आणत कंपनीने ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित केले होते. जिओने मोफत कॉलिंग देत कमी रुपयांत जास्त जीबी डेटा दिला होता. आता जिओला बाजारात पदार्पण करुन २ वर्षे झाली. त्याच निमित्ताने कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी एक भन्नाट ऑफर दिली आहे.

१०० रुपयांमध्ये कंपनी आपल्या ग्राहकांना ४२ जीबी डेटा देणार आहे. याबरोबरच ही ऑफर कंपनीच्या ३९९ रुपयांचा प्लॅनवरही लागू आहे. ३९९ रुपयांचा प्लॅन २९९ रुपयांमध्ये मिळणार असून त्याद्वारे १२६ जीबी डेटा मिळणार आहे. या प्लॅनची व्हॅलिडीटी ३ महिने असेल, तसेच यामध्ये मोफत अनलिमिटेड कॉलिंगही मिळेल. ग्राहकांना हा प्लॅन अॅक्टीव्हेट केल्यावर १०० रुपयांची कॅशबॅक ऑफर मिळणार असल्याने ३९९ रुपयांचा प्लॅन २९९ रुपयांना मिळणार आहे. यातील ५० रुपये लगेच कॅशबॅक मिळणार असून ५० रुपये Phonepe या मोबाईल वॉलेटमध्ये जमा होणार आहेत.

यासाठी ग्राहकांना मायजिओ अॅपद्वारे रिचार्ज करावे लागणार असून Phonepe द्वारे त्याचे पेमेंट करावे लागणार आहे. ही ऑफर आजपासून म्हणजेच १२ सप्टेंबरपासून सुरु होत असून २१ सप्टेंबरपर्यंत असेल असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. या कालावधीत ग्राहकांना एकदाच या ऑफरचा लाभ घेता येणार आहे. दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त नुकतीच जिओने आणखी एक विशेष ऑफर आणली होती. ५ रुपयांच्या चॉकलेटसोबत १ जीबी डेटा देत जिओने ग्राहकांना खुश केले होते. त्यामध्ये ५ रुपयांच्या कॅडबरीपासून १०० रुपयांच्या कॅडबरीपर्यंत ही ऑफर लागू असल्याचे सांगितले होते.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत