जिओ , एअरटेल, व्होडाफोनचे ५० रुपयांहून स्वस्त पॅक

नवी दिल्ली: रायगड माझा वृत्त 

भारतीय टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये रिलायन्स जिओने धडक मारल्यानंतर या क्षेत्रात स्पर्धेचे स्वरुपच बदलले आहे. ग्राहकांना कमीतकमी भावात जास्तीजास्त सुविधा देण्याची चढाओढच आता मोबाइल कंपन्यांमध्ये लागली आहे. जिओला टक्कर देण्यासाठी आता एअरटेल आणि व्होडाफोनने ५० रुपयांहून कमी किमतीचे दर्जेदार रिचार्ज पॅक आणले आहेत. या सगळ्या प्लॅन्सवर एक नजर टाकूया.

जिओचे ५० रुपयांहून कमी किमतीचे पॅक 

जिओचा २८ दिवस चालणारा ४९ रुपयांचा पॅक आहे. यात मोफत व्हॉइ्स कॉल आणि १ जीबी ४जी डेटा उपलब्ध आहे. याशिवाय १९ रुपयांचा एक पॅक आहे. एका दिवसापुरत्या मर्यादित असलेल्या या प्लॅनमध्ये ०.१५ जीबी ४जी डेटा, मोफत व्हॉइस कॉल आणि २० एसएमएस मिळत आहेत.

एअरटेलचे ५० रुपयांहून कमी किमतीचे पॅक 

जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलने अनेक पॅक आणले आहे. एअरटेलचा ४९ रुपयांचा एका दिवसापुरता मर्यादित असलेला एक पॅक असून यामध्ये ३जीबी डेटा मिळतो आहे. तसंच एअरटेल अॅप्सही यामध्ये वापरता येतील. याशिवाय १० रुपयांहून कमी किमतीचेही एअरटेलचे पॅक आहेत. एअरटेलच्या ९ रुपयांच्या प्लॅनमध्ये १०० एमबी डेटा,१०० एसएमएस आणि अमर्याद कॉल्सची सुविधा आहे. तर ८ रुपयांच्या प्लॅनमध्ये ३५ पैसे प्रति मिनिट या दराने ५६ दिवस लोकल आणि एसटीडी कॉल्स करता येणार आहेत.

१८ रुपयांच्या पॅकमध्ये दोन दिवस १०० एमबी डेटा ,२३ रुपयांच्या पॅकमध्ये २०० एमबी डेटा,१०० एसएमएस आणि अनलिमिटेड व्हॉइस कॉल्स देण्यात आले आहेत. याशिवाय २४,२५ २८ आणि २९ रुपयांचेही एअरटेलचे पॅक आहेत.

व्होडाफोनचे ५० रुपयांहून कमी किमतीचे पॅक 

व्होडाफोनचेही ५० रुपयांहून कमी किमतीचे आकर्षक पॅक आहेत. ११ रुपयांच्या पॅकमध्ये ६० एमबी डेटा मिळत असून या पॅकची वैधता एक दिवस आहे. २१ रुपयांच्या पॅकमध्ये एका तासासाठी अनलिमिटेड ४जी,३जी डेटा मिळतो आहे. तर ४७ रुपयांच्या पॅकमध्ये ५०० एमबी ३जी/४जी डेटा, 125 मिनट मोफत लोकल, एसटीडी आणि रोमिंग व्हॉइस कॉल्स मिळत आहेत. त्याशिवाय दररोज ५० एसएमएस मिळत आहेत. या पॅकची व्हॅलिडीटी २८ दिवस आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत