जिओ फोन २ चा आज फ्लॅश सेल

नवी दिल्ली : रायगड माझा वृत्त 

रिलायन्स जिओचा फीचर फोन ‘जिओ फोन २’ (Jio Phone 2) खरेदी करण्याची आज पुन्हा एकदा ग्राहकांना संधी आहे. आज दुपारी १२ वाजेपासून ‘जिओ फोन २’ चा फ्लॅश सेल सुरू होणार आहे. हा फोन जिओ. कॉमच्या (jio.com) अधिकृत वेबसाइटवरून खरेदी करता येवू शकणार आहे. या फोनची किंमत २ हजार ९९९ रुपये इतकी आहे.
जिओ फोन २ या हँडसेटचे वैशिष्ट्ये म्हणजे याची डिझाइन ही जुन्या ब्लॅकबेरीची आठवण करून देते. कारण यात QWERTY कीपॅड आहे. हा एक फीचर असलेला स्मार्टफोन आहे. आज दुपारी १२ वाजेपासून जिओ फोन २ चा फ्लॅश सेल सुरू होणार आहे.

Jio Phone 2 ची वैशिष्ट्ये 

>> स्मार्ट फीचर फोन असून यात क्वर्टी कीबोर्ड
>> ५१२ एमबी रॅम आणि ४ जीबी इंटरनल स्टोरेज
>> मायक्रोएसडी कार्डच्या साहायाने १२८ जीबीपर्यंत वाढवू शकतो
>> जिओफोन 2 KaiOS अंतर्गत काम करतो
>> २००० mAh क्षमतेची बॅटरी
>> व्हाइस कमांड्ससाठी वेगळे बटन
>> ४ जी व्हीओएलटीई, ब्लूटूथष जीपीएस, एनएफसी, एफएम रेडिओ फीचर्स
>> आधीपेक्षा डिस्प्ले मोठा देण्यात आला आहे

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत