जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षकांची कमतरता असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

सात दिवसात शिक्षकाची नेमणूक न केल्यास देवपाडा ग्रामस्थ शाळेला ठोकणार टाळे

नेरळ : कांता हाबळे

कर्जत तालुक्यातील पोशीर ग्रामपंचायत हद्दीत देवपाडा गावात जिल्हा परिषदेची शाळा असून येथे शिक्षकांनी कमतरता असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. दीड वर्षांपूर्वी येथील एका शिक्षकाची बदली झाल्याने त्यांच्या जागेवर अद्याप शिक्षकाची नेमणूक केली नसल्याने पालक आणि ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षकांची कमतरता असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

अनेकवेळा पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे तक्रार करूनही अद्याप शिक्षकाची नेमणूक करण्यात आली नाही. त्यामुळे शाळा व्यवस्थापन समितीने पुन्हा एकदा शिक्षकाची नेमणूक करण्यासंदर्भात पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे पत्र दिले आहे. सात दिवसात शिक्षणाची नेमणूक केली नाही तर शाळेला टाळे ठोकू असा इशारा देवपाडा ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीने दिला आहे

देवपाडा येथे इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत शाळा असून येथे सुमारे दीडशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. देवपाडा गावासह आजूबाजूच्या आदिवासी वाडीतील विद्यार्थी येथे शिक्षण घेण्यासाठी येत आहेत. या शाळेत मुख्याध्यापक व चार सह शिक्षक आहेत. मुख्याध्यापक यांना अतिरिक्त कामे असल्याने त्यांना दररोज शिकण्यास वेळ नसतो या असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे..
ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांकडे शासनाचे नेहमीच दुर्लक्ष झालेले पाहायला मिळत आहे. देवपाडा शाळा त्याला अपवाद नाही. देवपाडा या ग्रामीण भागात असलेल्या शाळेत देवपाडा व आजूबाजूच्या आदिवासी वाडीतील मुले या शाळेत शिक्षण घेण्यासाठी येत असतात. शासनाने या शाळेकडे दुर्लक्ष केले असल्याचे ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आहे. शिक्षकांच्या कमतरतेमुळे येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने पुन्हा एकदा पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला पत्र देऊन देवपाडा शाळेवर सात दिवसात शिक्षकाची नेमणूक करावी अन्यथा आम्ही ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समिती शाळेला टाळे ठोकू व जोपर्यंत शिक्षक हजर होत नाही तोपर्यंत शाळा बंद ठेऊ असा इशारा पालकांनी आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लक्ष्मण शिणारे यांनी दिला आहे. आहे.
देवपाडा शाळेतील एका शिक्षकाची दीड वर्षांपूर्वी बदली करण्यात आली आहे. त्या जागी अद्याप दुसऱ्या शिक्षकाची नियुक्तत्ती करण्यात आली असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यासाठी आम्ही मागील वर्षी गटशिक्षण अधिकारी यांच्याकडे शिक्षकाची नेमणूक करावी अशी मागणी केली होती. परंतु अद्याप शिक्षकाची नेमणूक करण्यात आली नसल्याने आम्ही पुन्हा एकदा शिक्षकाची मागणी करण्यासंदर्भात पत्र दिले आहे. सात दिवसात शिक्षणाची नियुक्ती केली नाही तर आम्ही शाळेला टाळे ठोकू असेही कळविले आहे 
 – लक्ष्मण शिणारे अध्यक्ष , शाळा व्यवस्थापन समिती, देवपाडा
या संदर्भात नव्याने रुजू झालेल्या गटशिक्षण अधिकारी सुरेखा हिरवे यांच्याकडून या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून कोणतीही माहिती देण्यात आली नाही.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत