जिवा फुड्स कंपनीच्या पाठीशी ग्रामस्थ, कामगार ठाम !

उपोषणकर्त्या विरोधात तहसील कार्यालयासमोर कामगारांचे ठीयां आंदोलन !

पाली : विनोद भोईर

सुधागड तालुक्यातील मौजे करंजघर येथील जिवा फुड्स प्रा.लि.याच्या मशरूम कंपनी विरोधात तेथील रहिवाशी गजानन वाडेकर यांनी सदर कंपनीचे बांधकाम अनधिकृत असून    येथून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटत असल्याने ही कंपनी काय स्वरूपी बंद करण्यात यावी आदी मागणी करिता दि. २७ ऑगस्ट पासून पाली तहसील कार्यालयाच्या आवारात उपोषण सुरु केले आहे.

त्या उपोषणाच्या विरोधात पिलोसरी, करंजघर, खवली, येथील आदिवासी वाड्या व कंपनीतील कामगार यांनी सदर कंपनी सरूच राहिली पाहिजे यासाठी  दि. २८ ऑगस्ट रोजी पाली तहसीलदार बी.एन. निंबाळकर, पाली पोलीस निरीक्षक रविंद्र शिंदे यांना सुमारे ४०० ते ५०० ग्रामस्थ व कामगार यांनी मोठ्या संख्येनी उपस्थित राहून निवेदन दिले व सदर उपोषण कर्त्या विरोधात तहसील कार्यालया समोर दोन तासाचे ठीया आंदोलन केले.

यावेळी शेकापचे युवा नेते आरिफ मनियार, यांनी बोलतांना सागितले की सुधागड तालुका हा ग्रामीण असल्याने येथील परिस्थिती खूप बेताची आहे. येथील बराचसा भाग हा इको सेन्सिटिव्ह झोन, ग्रीन झोन मध्ये मोडत असल्याने येथे कंपन्या होत नाहीत त्यामुळे संधी फारच कमी. आणि अशातच काही विघ्नसंतोषी लोक आपल्या गाव शेजारी असणाऱ्या व तेथील लोकांना रोजगार मिळवून देणाऱ्या कंपन्या बंद व्हाव्यात यासाठी नव नवीन शक्कल लढवीत आहेत ही बाब अत्यंत वाईट आहे.असं झाल्यास या कंपनीच्या जीवावर येथील १५० ते २०० कुटुंबांचा उदरनिर्वाह होत आहे त्यांच्यावर बेकारीचे संकट कोसळल्यास त्यांची जबाबदारी हे लोक घेतील का? आदि बाबींचा विचार करून प्रशासनाने ग्रामस्थ व कामगारांचे हित लक्षात घेऊन निर्णय घ्यावा. या मशरूम कंपनीच्या माध्यमातून पंचक्रोशीतील  महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी मिळाली असून सदर महिला आपल्या पायावर उभ्या राहून  आपले कुटुंब पोसत आहेत त्यांचा रोजगार गेल्यास आम्ही सर्व महिला मोठ्या प्रमाणत आंदोलन छेडू, सुधागड तालुक्यात कारखाने येवून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मोती व्हावी आसे शासनाचे धोरण असून त्यामुळे सदर कंपनी बंद होणार नाही याची दक्षता वरिष्ठ पातळीवरून घेतली जाईल असे तहसीलदार बी.एन. निंबाळकर यांनी आंदोलन कर्त्यांना सागितले.

यावेळी  शेकाप युवा नेते आरिफ मनियार, विठ्ठल वाडेकर, सागर वाडेकर, बाळू वाडेकर, सखाराम माने, सुधीर केदारी, रविद्र दर्गे, संदीप तलकर, लक्ष्मण किलंजे, बाला केदारी, उपसरपंच रेश्मा तळकर, सदस्या सुलभा पवार, सुनील केदारी, सुरेश चिले, जितेंद्र चोरघे, माधुरी वाघमारे उपस्थित होते.

 

मशरूम कंपनीच्या माध्यमातून पंचक्रोशीतील महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी मिळाली असून सदर महिला आपल्या पायावर उभ्या राहून  आपले कुटुंब पोसत आहेत त्यांचा रोजगार गेल्यास आम्ही सर्व महिला मोठ्या प्रमाणत आंदोलन छेडू.

मीनल यादव, महिला कामगार  

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत