‘जीएसटी’च्या जाहिरातीवर कोटयावधी रुपये खर्च

नवी दिल्ली : रायगड माझा वृत्त 

वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटीच्या जाहिरातीसाठी केंद्र सरकारने तब्बल १३२.३८ कोटी रुपये खर्च केले आहेत, अशी माहिती ‘आरटीआय’ मधून उघड झाली आहे. सूचना आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत काम करणाऱ्या एका एजन्सीने ही माहिती दिली आहे.

१ जुलै २०१७ पासून देशभरात जीएसटी लागू केल्यानंतर याची सर्वांना माहिती व्हावी यासाठी केंद्र सरकारने तब्बल १३२ कोटींहून अधिक रक्कम जाहिरातबाजीवर खर्च केली आहे. ९ ऑगस्ट २०१८ ला मिळालेल्या माहिती अधिकार कायद्यांतर्गत ही माहिती उघड झाली आहे. केंद्र सरकारने जीएसटीच्या जाहिरातीसाठी कोट्वधी रुपये खर्च केले असले तरी इलेक्ट्रॉनिक मीडियावर एक रुपयाही खर्च करण्यात आला नाही, असेही आरटीआयमधून उघड झाले आहे.

केंद्र सरकारने जीएसटी लागू केल्यानंतर याची जोरदार चर्चा झाली होती. वस्तू आणि सेवा कर कायदा हा केंद्र सरकारचा सर्वात क्रांतिकारी निर्णय समजला जात आहे. या करालाच Goods and Services Tax म्हणूनही ओळखले जातेय. जीएसटीला अनेक स्तरांतून विरोध झाला होता. व्यापारी आणि विरोधकांनी जीएसटीला जोरदार विरोध केला होता.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत