जुन्नरमधील शिवसैनिकांचे सामूहिक राजीनामे

रायगड माझा वृत्त 

जुन्नर मधील राजकारण कमालीचे तापले आहे. लोकसभेच्या पराभवाला जबाबदार धरत विधानसभेच्या दावेदार आशाताई बुचके यांची शिवसेनेतून हकालपट्टी केल्याचे पडसाद आता जुन्नरच्या राजकारणात उमटू लागले आहे. जुन्नर शहरातील आजी माजी पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत आशाताई बुचके यांच्या समर्थनार्थ समुखीक राजीनाम्याचे शस्त्र उगारले आहे.

नुकताच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत अढाळराव पाटील यांचा झालेला पराभव शगीवसेनेच्या जिव्हारी लागला आहे. त्यातून राजकीय रणनीतीवर प्रशांत किशोर यांचा अहवाल आणि त्यानंतर शहनिशा करून पक्षविरोधी काम केल्याचा अनेकांवर ठपका ठेवण्यात आला. पुणे शिरूर मतदारसंघातील अनेकांना शिवसेनेतून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. त्यामध्ये आशाताई बुचके यांचाही समावेश आहे. २०१४ची विधानसभा निवडणूक आशाताई शिवसेनेकडून लढल्या होत्या. त्यावेळी मनसेचे शरद सोनावणे यांच्याकडून त्यांना पराभूत व्हावे लागले होते. मात्र आता शरद सोनावानेच शिवसेनेनेत दाखल झाले आहे. जुन्नरची त्यांची उमेदवारी निश्चित मनाली जाते. त्यामुळे उमेदवारीसाठी अडसर नको म्हणून निष्ठवंत आशाताई बुचके यांचा बळी दिला जात असल्याची शिवसैनिकांची भावना असल्याचे बोलले जाते. त्यामुळे आशाताई बुचके यांच्या हकालपट्टीची विरोधात शिवसैनिक एकवटले असून त्यांनी सामूहिक राजीनाम्याचे अस्त्र उगारले आहे. आता शिवसैनिकांच्या या खेळीचा पक्षावर काही परिणाम होतो का हे पाहणे महत्वाचे ठरेल.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत