जुन्या ५०० व एक हजारांच्या २० हजार नोटा जप्त; संगमनेरच्या नगरसेवकासह पाच जणांना अटक

संगमनेर : रायगड माझा

चलनातून बाद झालेल्या ५०० व एक हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी आलेल्या पाच जणांना खडक पोलिसांनी रंगेहाथ पकडले असून त्यांच्याकडून सुमारे अडीच कोटी रुपये किंमतीच्या २० हजार नोटा जप्त केल्या आहेत. त्यातील एक जण संगमनेर येथील नगरसेवक आहे. (वय ४७, रा़ संगमनेर, बी एड कॉलेज रोड, संगमनेर), विजय अभिमन्यू शिंदे (वय३८, रा. वाकडेवाडी, संभाजीनगर, खडकी), अदित्य विश्वास चव्हाण (वय २५, रा. भुगाव रोड, ता. मुळशी), सुरेश पांडुरंग जगताप (वय ४०, रा. खराडेवाडी, ता. फलटण, जि. सातारा) आणि नवनाथ काशिनाथ भंडागळे (वय २८, रा. कर्वेनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.


गजेंद्र बजाबा अभंग

याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक वैभव पवार यांनी फिर्याद दिली आहे़ याबाबत पोलिसांनी सांगितले की, वैभव पवार यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, चलनातून बाद झालेल्या नोटा बदलून घेण्यासाठी काही जण येणार आहे, त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक लोहोमकर, माळी, बारवकर, केकाण, नदाफ, क्षीरसागर, माळवदकर यांनी रविवारी पेठेतील बंदिवान मारुती मंदिराजवळ सापळा रचला. रात्री साडेअकराच्या सुमारास  काही जण आले़ त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांच्यातील दोघांकडील बॅगेत चलनातून बाद झालेल्या ५०० रुपयांच्या १००ची १९ बंडले आणि एक हजार रुपयांच्या नोटांच्या १००ची १६० बंडले मिळून आली.

त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी या नोटा बदलून देण्यासाठी एक जण येणार होता़ त्यांची आम्ही वाट पहात होतो.  अशी माहिती मिळाली. खडक पोलिस अधिक तपास करीत आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबर २०१६ मध्ये या नोटा रद्द करण्याची घोषणा केली होती, त्या बदलून घेण्यासाठी डिसेंबरअखेर मुदत देण्यात आली होती; या घटनेला आता काही महिन्यातच दोन वर्षे होतील, असे असताना लोकांनाकडे बाद झालेल्या इतक्या नोटा असल्याचे पाहून पोलीसही चक्रावून गेले आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत