रायगड माझा वृत्त
गुजरातच्या कच्छ येथे मंगळवारी मोठा अपघात झाला. कच्छ येथील मुंद्रा परिसरात भारतीय हवाई दलाचं ‘जॅग्वार’ हे फायटर विमान कोसळलं. या जॅग्वार विमानाने जामनगर येथून उड्डाण घेतलं होतं अशी माहिती आहे. या घटनेमध्ये पायलटचा मृत्यू झाला आहे.
जामनगरहून सकाळी जवळपास साडेदहाच्या सुमारास विमानाने नियमित सरावासाठी उड्डाण घेतलं होतं. जामनगरातील हवाई तळावर नियमित सराव सुरू असताना विमान बेरजा गावाजवळील माळरानावर कोसळले. हा अपघात नेमका कसा झाला याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही पण अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. संजय चौहान असं मृत पायलटचं नाव आहे.
शेयर करा