जेएसडब्ल्यु कंपनीच्या ब्लास्ट फर्निस प्लांटमध्ये स्फोट; स्पोटात 7 जखमी

पेण : देवा पेरवी

पेण तालुक्यांतील डोलवी येथील जेएसडब्ल्यु कंपनीतील ब्लास्ट फर्निस प्लांटमध्ये स्फोट होऊन त्यात सात कामगार भाजले आहेत. त्यापैकी अत्यवस्थ चौघानां ऐरोली येथील रुग्णालयात हलविण्यात आले असून उर्वरित पेण येथील वैरागी हॉस्पिटल मध्ये उपचार घेत आहेत. जेएसडब्ल्यु कंपनीत शुक्रवारी सकाळी पहील्या पाळीतील कामगार ब्लास्ट फर्निस प्लांटमध्ये काम करत असताना लाईट गेल्याने व तांत्रिक बिघाड झाल्याने अचानक प्लांटमध्ये स्फोट झाला. त्यामुळे एकच खळबळ उडाली.

या स्फोटांत स्थानिक कामगार अरुण तांबोळी, वय 40, रा.आमटेम, सुनील म्हात्रे, वय 30, रा.वढाव, शिवदास म्हात्रे, रा.बोरी, गणेश शेळके, रा.अलिबाग,  बुद्धीराम लल्लान रा.अलिबाग, यशवंत रहाटे, रा.पेण, इरशाद खान हे कामगार भाजले आहेत. त्यांना पेण येथील डाॅ.सचिन वैरागी यांच्या रुग्णालयात आणण्यात आले. मात्र त्यापैकी सुनिल म्हाञे, रा.वढाव व शिवदास म्हाञे, रा.बोरी यांच्यावर डाॅ. वैरागी यांच्या दवाखान्यात उपचार सुरु आहेत. तर गंभीर जखमी असलेले अरुण तांबोली, रा.आमटेम, गणेश शेळके, रा.अलिबाग, बुध्दिराम लल्लान रा.अलिबाग, यशवंत रहाटे ( शीप्ट इनचार्ज ), इरशाद खान हे अधिक भाजल्याने त्यांना पुढील उपचारासाठी ऐरोली येथील नॅशनल बर्न्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जेएसडब्ल्यु कंपनीत असे स्फोट नेहमीच होत असतात मात्र अनेकवेळा परप्रांतीय कामगार असल्याने त्याचा सुगावाही अनेकवेळा लागत नाही. व अनेकवेळा स्थानिक पोलीस स्टेशनला नोंदही नसते.

” जेएसडब्ल्यु डोळवी प्लांटला विजवीतरण कंपनीकडून होणार वीज पुरवठा सकाळी 11 वाजता अचानक खंडित झाला, त्यामुळे ब्लास्ट फर्निस युनिट सहित संपूर्ण प्लांट मध्ये विद्युत पुरवठा खंडित झाल्याने युनिट मध्ये ऑपरेशन प्रोसेस थांबल्याने स्लॅग प्रोसेसिंग कार्यप्रणाली बंद पडली त्यामुळे गरम असलेला स्लॅग काहीअंशी इतरत्र पसरला. गरम असलेल्या स्लॅगचे खडे तिथे उपस्थित असलेल्या 7 कर्मचाऱ्यावर पडले. त्यात काही कर्मचाऱ्याना भाजल्याने इजा झाली आहे. परंतु कोणत्याही कर्मचाऱ्याला मोठी इजा झालेली नाही. 7 कर्मचाऱ्यापैकी 4 कर्मचाऱ्याना नॅशनल बर्न सेंटर ऐरोली येथे व उर्वरित कर्मचाऱ्याना पेण येथील डॉ.वैरागी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जेएसडब्ल्यु कंपनी व्यवस्थापन या सर्व कर्मचाऱ्याची पूर्ण पणे काळजी घेत असल्याचे कंपनी तर्फे अरुण शिर्के यांनी सांगितले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत