जेट एअरवेजची पुणे-सिंगापूर थेट सेवा सुरू

पुणे : रायगड माझा वृत्त 

जेट एअरवेजच्या माध्यमातून दि. १ डिसेंबरपासून पुणे-सिंगापूर थेट सेवा सुरू करण्यात येत आहे. पुण्याहून थेट परदेशात जाण्यासाठीचा सिंगापूर हा पाचवा मार्ग ठरणार आहे.

या मार्गाची औपचारिक घोषणा करण्यासाठी लोहगाव विमानतळ येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार व विमानतळ सल्लागार समितीचे अध्यक्ष अनिल शिरोळे, राज्य सरकारच्या नागरी विमान वाहतूक सचिव वलसा नायर सिंग, राज्यसभेचे खासदार संभाजीराजे छत्रपती, विमानतळ संचालक अजय कुमार, सिंगापूर पर्यटन मंडळाचे प्रादेशिक संचालक जी. बी. श्रीधर आणि जेट एअरवेजचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुबे आदी यावेळी उपस्थित होते.

हिंदुस्थानातून सिंगापूरला जाणाऱ्या पुणेकरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे पुणे-सिंगापूर थेट सेवेला प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद मिळेल, असा विश्वास विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी व्यक्त केला. दरम्यान, लोहगाव विमानतळावर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय कार्गाे सेवाही सुरू करण्यात आली असल्याचे विमान प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत