जेष्ठ पत्रकार सुनिल तथा दादा दांडेकर यांचे निधन

 कर्जत(रायगड) : रायगड माझा वृत्त

 

कर्जतचे जेष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील भास्कर तथा दादा दांडेकर यांचे आज मध्यरात्री दीड  वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

अत्यंत मनमिळावू आणि उत्तम संघटक अशी सुनील दांडेकर यांची ओळख होती . दहिवली ग्रामपंचायतीचे सरपंच राहिलेले  दादा दांडेकर राजकारणात रमले नाहीत . त्यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराचा पगडा राहिला . संघ स्वयंसेवक म्हणून त्यांनी कार्य केले. विश्व हिंदू परिषदेचे ते पूर्ण वेळ प्रचारक राहिले. पत्रकारितेची त्यांना पूर्वीपासून आवड . विविध वर्तमान पत्रातून  विपुल लेखन केल्यावर २००० साली त्यांनी रायगड ची खाण  हे साप्ताहिक सुरु केले . अत्यंत प्रतिकूल परिस्थिती त्यांनी हे साप्ताहिक सुरु ठेवले. दैवज्ञ समाजाच्या संघटनात दादा दांडेकर यांचा सिंहाचा वाट राहिला . पत्रकार म्हणून त्यांनी रायगड प्रेस क्लब , कर्जत तालुका मराठी पत्रकार संघ ,मराठी पत्रकार परिषद आणि महाराष्ट्र राज्य संपादक परिषदेसाठी मोलाचे काम केले. पत्रकारांच्या अनेक आंदोलनात दादा दांडेकर यांचा अग्रणी सहभाग राहिला आहे. उत्तम संघटक . उत्तम सामाजिक कार्यकर्ता , जेष्ठ पत्रकार आणि त्या पेक्षाही उत्तम माणूस अशी दादा दांडेकर यांची समाजात प्रतिमा राहिली आहे. त्यांच्या अचानक जाण्याने एक मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. दादा दांडेकर यांना रायगड माझाची भावपूर्ण श्रद्धांजली.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत