जे नको ते मतदारांनी नाकारले; मतदारांचे अभिनंदन – उद्धव ठाकरे

uddhav thackeray

मुंबई : रायगड  माझा वृत्त 

‘‘पर्याय कोण? या फालतू प्रश्नात गुंतून न पडता चार राज्यांतील मतदारांनी जे धाडस दाखवले त्यांच्या बेडरपणाचं मी अभिनंदन करतो,’’ अशा प्रखर शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

चार राज्यांतील निवडणूक निकालांवर उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले होते. उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण निकालानंतर आपले मत मांडले. ‘‘निवडणुकीत हार-जीत तर होतेच. जिंकतो त्याचे अभिनंदन होतच असते. पण चार राज्यांत परिवर्तन घडवणाऱया निर्भय मतदारांचे मी अभिनंदन करतो. त्यांनी ते ईव्हीएम, पैसावाटप, गुंडागर्दी आणि त्याही पेक्षा पर्याय कोण? या फालतू प्रश्नांत गुंतून न पडता जे नकोत त्यांना आधी नाकारले, उखडून फेकले. पुढचे पुढे काय ते बघू. हेच खरे धाडस आहे. मतदारांच्या धाडसाने देशाला दाखविलेली ही दिशा आहे. त्या सर्व मतदारांचं मी मनापासून अभिनंदन करतो,’’ असेही शेवटी उद्धव ठाकरे म्हणाले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत