जॉन्सनच्या कामगिरीपुढे ऑलिम्पिक गोल्ड फिके!

रायगड माझा वृत्त 

 

आशियाई क्रीडा स्‍पर्धेत भारतीय ॲथलेटिक्‍सनी जोरदार कामगिरी करताना यंदा ७ सुवर्णपदकांची कमाई केली आहे. विशेष म्‍हणजे ४० वर्षांनी अशी कामगिरी यंदा होत आहे. त्यात विशेष लक्ष्य वेधले धावपटू जिन्‍सन जॉन्‍सन याने. जॉन्‍सनने दोन पदके जिंकली. ८०० मीटर धावण्याच्या शर्यतीत मिळविलेल्या रौप्यपदकानंतर १५०० मीटरमध्ये सुवर्ण दौड केली. विशेष म्‍हणजे त्याच्या कामगिरीची तुलना केल्यास ती रिओ ऑलिम्‍पिकमध्येही सुवर्ण विजेती ठरली असती.

जॉन्‍सनने १५०० मीटरचे अंतर ३ मिनिटे ४४.७२ सेकंदात पार करत आशियाई क्रीडा स्‍पर्धेत सुवर्णपदक मिळवले. विशेष म्‍हणजे याच प्रकारात यापेक्षा अधिक वेळ रिओ ऑलिम्‍पिक विजेत्याने घेतला होता. ऑलिम्‍पिक विजेता मॅथ्यू याने हिट अँड रन प्रकारातच १५०० मीटर अंतराचे सुवर्णपदक मिळविण्यासाठी ३ मिनिटे ५० सेकंदांचा वेळ घेतला होता. त्यामुळे जॉन्‍सनची या स्‍पर्धेतील कामगिरी रिओ ऑलिम्‍पिक विजेत्यापेक्षाही सरसच ठरली आहे.

विशेष म्‍हणजे जॉन्‍सनची आशियाई स्‍पर्धेत सुवर्णपदक विजेती कामगिरी ही सुद्धा सर्वोत्‍कृष्‍ट नाही. तर त्याने आपली सर्वोत्‍कृष्ट कामगिरी राष्‍ट्रकुल स्‍पर्धेत नोंदवली होती. यंदाच झालेल्या राष्‍ट्रकुल स्‍पर्धेत जॉन्‍सनने सुवर्णपदकावर नाव कोरले होते. यात त्याने ३ मिनिटे ३७.६२ सेकंदात सुवर्णदौड पूर्ण केली होती.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत