ज्यांनी नगरपंचायत होऊदिली नाही, त्यांना पुन्हा नगरपंचायत मागण्याचा नैतिक अधिकार आहे ? : प्रकाश देसाई

पाली – विनोद भोईर

 

पाली ग्रामपंचायत नगरपंचायत व्हावी यासाठी पालीच्या सर्वपक्षीय राजकीयवर्तुळात धुमशान सरू असतांना. यात शिवसेना मात्र शांत होती अखेर त्यांनी मौन सोडले असून  शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख प्रकाश देसाई यांनी याबाबत बोलतांना सागितले की राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने २६ जून २०१५ रोजी अधिसूचना काढून पाली ग्रामपंचायतीसह रायगड जिल्ह्यातील पाच ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर करण्याचे अध्यादेश काढले.

या अधिसूचने विरोधात पाली ग्रामपंचायतीचे तत्काळीन सरपंच व सदस्य यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या स्थानिक पुढाऱ्यांच्या आदेशाने न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल केली व त्याचा निकाल त्यांचे बाजूने लागून पुन्हा पाली ग्रामपंचायत करण्यात ही लोक यशस्वी झाली . मग त्यावेळी यांना ग्रामपंचायत कशासाठी हवी होती. बिल्डरांकडून वसुलीसाठी ? की पालीकरांचे विकासासाठी यांची उत्तरे प्रथम या मंडळींनी पालीकरांना द्यावीत आणि मगच पाली ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यासाठी पालीतील नागरिकांना विनवणी करावी. अन्यथा यांना पुन्हा पाली नगरपंचायत करण्याचा नैतिक अधिकारच नाही असा खडा सवाल शिवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख प्रकाश देसाई यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केला आहे. ते पुढे म्हणाले की पाली नगरपंचायत व्हावी अशी जर या मंडळींची मनापासून इच्छा होती तर त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होण्याची वाट पहिली ? या अगोदर प्रक्रिया का सुरु केली नाही. एवढ नकळण्याइतकी पालीची जनता वेडी नाही यांनी आपला ढोंगीपणा थांबवावा.

निवडणूक आयोगाचे विरोधात पुन्हा न्यायालयात जाऊन अथवा ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकून ही प्रक्रिया तात्काळ यशस्वी होयील ? यांची या मंडळींनी पालीकराना खात्री द्यावी नाहीतर पुन्हा ग्रामपंचायतीवर प्रशासक बसल्यावर सर्व सामान्य जनतेची छोटीमोठी कामे रखडल्यास त्याला जबाबदार कोण? सहजासहजी आलेली पाली नगरपंचायत घालविण्याचे पातक शेतकरी कामगार पक्षानेच केले असून आणि आता ती नगरपंचायत पुन्हा आणण्यासाठी ४० ते ५० लोकांच्या मोर्चाने शक्य होणार नाही त्यासाठी पाली ग्रामपंचायतीच्या प्रत्येक मतदारांला विश्वासात घेऊन त्यांची मते जाणून घेण गरजेच ठरेल तरच पुढील गोष्टी यशस्वी होतील. असे शेवटी प्रकाश देसाई यांनी सागितले .

शेयर करा

2 thoughts on “ज्यांनी नगरपंचायत होऊदिली नाही, त्यांना पुन्हा नगरपंचायत मागण्याचा नैतिक अधिकार आहे ? : प्रकाश देसाई

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत