‘ज्या दिशेनं हवा असेल, त्या पार्टीची साथ देणार’, रामदास आठवलेंचं मोठं विधान

मुंबई : रायगड माझा वृत्त 

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेससोबतच्या हातमिळवणीसंदर्भात एक मोठं आणि सूचक विधान केले आहे. ‘ज्या दिशेनं हवा असेल, त्या पार्टीची साथ देणार’, असे विधान रामदास आठवले यांनी केले आहे. भाऊबीजनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केले आहे.

रामदास आठवले म्हणाले की, नसीम खान (काँग्रेस) बोलत आहेत की, तुम्ही आमच्यासोबत या. मी 10-15 वर्षांपर्यंत काँग्रेससोबत होतो. इथेही (भाजपा) मला 5-20 वर्षांपर्यंत राहावं लागणार. जोपर्यंत सरकार आहे तोपर्यंत भाजपासोबत राहणार. जेव्हा हवा दिशा बदलेल तेव्हा अंदाज घेऊन मी निर्णय घेईन.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत