ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचे निधन

मुंबई : रायगड माझा ऑनलाईन 

Image result for kader khan

प्रकृती खालावल्‍याने रुग्‍णालयात उपचार घेत असलेले ज्येष्ठ अभिनेते कादर खान(वय, ८१) यांचे निधन झाले आहे. कॅनडातील रुग्णालयात त्‍यांनी अखेरचा श्वास घेतला.

गेल्‍या काही दिवसांपासून कादर खान प्रकृती खालावल्‍याने कॅनडामधील खासगी रुग्‍णालयात उपचार घेत होते. प्रोग्रेसिव्‍ह सुप्रो न्यूक्लियर पाल्सी डिसऑर्डरमुळे कादर खान यांच्या मेंदूचे कार्य बंद पडल्‍याने त्‍यांना व्‍हेंटीलेटरवर ठेवण्‍यात आले होते.

कादर खान यांनी ‘दिमाग का दही’ (२०१५) या शेवटच्‍या चित्रपटात काम केले होते. कादर खान यांनी आपल्‍या ४३ वर्षांच्‍या सिनेकरिअरमध्‍ये जवळपास ३०० हून अधिक चित्रपटात अभिनय आणि २५० हून अधिक चित्रपटात संवाद लिहिले आहेत.

कादर खान यांच्‍या गुडघ्‍यावर २०१७ मध्‍ये शस्‍त्रक्रिया झाली होती. त्‍यांना अधिक चालता येत नव्‍हते. त्‍यानंतर, त्‍यांची सातत्‍याने प्रकृती बिघडत होती. त्‍यामुळे त्‍यांच्यावर खासगी रुग्‍णालयात उपचार सुरु होते.

कादर खान अनेक वर्षांपासून कॅनडामध्‍ये मुलगा सरफराज आणि सून शाईस्तासोबत राहत होते. त्यांच्या पार्थिवावर कॅनडातच अंत्यसंस्कार होणार आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत