ज्येष्ठ अभिनेत्री रिटा भादुरी यांचे निधन

रायगड माझा वृत्त :

मुंबई, 17 जुलैः हिंदी मालिका ‘निमकी मुखिया’मध्ये इमरती देवीची भूमिका साकारणाऱ्या रीटा भादुरी यांचे मंगळवारी सकाळी अखेरचा श्वास घेतला. त्या 62 वर्षांच्या होत्या. गेल्या 10 दिवसांपासून मुत्रपिंडाच्या आजाराने त्या सुजय रुग्णालयात भरती होत्या. अखेर मूत्रपिंड निकामी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. अभिनेते शशिर शर्मा यांनी त्यांच्या सोशल मीडियावर रिटा भादुरी यांच्या निधनाची वार्ता शेअर केली. शिशिर यांनी फेसबुकवर ही दुःखद वार्ता शेअर करताना ते म्हणाले की, ‘रिटा भादुरी आपल्यात राहिल्या नाहीत. 17 जुलैला दुपारी 12 वाजता अंधेरी पश्चिम, मुंबई येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. आम्हा सर्वांसाठी त्या आईसारख्या होत्या. त्यांची फार आठवण येईल…’

रिपोर्टनुसार, काही दिवसांपूर्वी त्यांची तब्येत ढासळत होती. तपासामध्ये त्यांना मूभपिंडाचा त्रास असल्याचे निदर्शनासा आले. यामुळे त्यांना दर दोन दिवसांनी डायलिसिससाठी जावे लागायचे. आरोग्याची समस्या असतानाही त्यांनी मालिकेचे चित्रीकरण कधी थांबवले नाही. जेव्हा त्यांना मोकळा वेळ मिळायचा, त्या सेटवरच आराम करायच्या.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत