ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर यांचे निधन

रायगड माझा वृत्त

मराठी चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ दिग्दर्शक यशवंत भालकर(६२) यांचे ह्रद्यविकाराच्या तीव्र झटक्याने आज सकाळी निधन झाले आहे. त्यांच्यामागे पत्नी,मुलगी,मुलगा आणि जावई, नातू असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने मराठी सिनेविश्वावर शोककळा पसरली आहे.

भालकर यांनी तब्बल १३ मराठी चित्रपटांचे तर ६ माहितपटांचे दिग्दर्शन केले होते. घे भरारी,नाथा पुरे आता, पैज लग्नाची, लेक लाडकी या गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शन भालकर यांनी केले होते. त्यांच्या पैज लग्नाची या सिनेमाला १४ राज्य पुरस्कार मिळाले होते तर घे भरारी या चित्रपटाला पाच व्ही शांताराम पुरस्कार मिळाले होते. सलग दोन वर्षं ते अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष होते. चित्रपटसृष्टीच्या परिघापलीकडे जाऊन भालकर यांनी बरेच सामाजिक कार्य देखील केले होते. कोल्हापुरातील रंकाळा स्वच्छता मोहिमेत त्यांचा सिंहाचा वाटा होता. लामणदिवा, पडद्यामागचा सिनेमा आणि मला भेटलेली मोठी माणसं अशी पुस्तकंही त्यांनी लिहिली होती.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत