ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे काळाच्या पडद्याआड

मुंबई: महाराष्ट्र News 24 वृत्त 

ज्येष्ठ रंगकर्मी आणि ‘आविष्कार’ नाट्यसंस्थेचे संस्थापक अरुण काकडे यांचे आज दुपारी ८९ च्या वर्षी मुंबई येथील राहत्या घरी निधन झाले.  ते 50 हून अधिक वर्ष रंगभूमीवर कार्यरत होते. त्यांच्या निधनाने रंगभूमीवर शोककळा पसरली आहे.

अरुण काकडे ह्यांच ‘अमका’ हे आत्मचरित्र प्रसिद्ध झालं होतं. ते 94 व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते. काकडे यांना संगीत नाटक अकादमी, झी मराठी जीवनगौरव, ध्यास-सन्मान अशा अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. अरुण काकडेंची रंगभूमीवरील वाटचाल पुण्यातून सुरु झाली होती. त्याकाळातील विजया मेहता, विजय तेंडुलकर, अरविंद देशपांडे या दिग्गज रंगकर्मींसोबत त्यांनी रंगायन ही नाट्यसंस्था  सुरु केली. त्यावेळी या संस्थेतर्फे विविध विषयांवरील नाटकं सादर केली. रंगायन या नाट्यसंस्थेत पुढे वाद झाले आणि अरुण काकडे यांनी अरविंद देशपांडे आणि विजया मेहता यांच्यासोबत 1971 साली आविष्कार ही नवीन नाट्यसंस्था सुरु केली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत