झारखंड विधानसभा निवडणुकीत भाजपला धक्का..?

रांची : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त 

भाजपला झारखंड विधानसभा निवडणुकीत मोठा धक्का बसल्याचे स्पष्ट होत आहे. झारखंड विधानसभा निवडणूक निकालाचा कल पाहता काँग्रेस आणि मित्रपक्ष बहुमताकडे वाटचाल करत आहेत. तर भारतीय जनता पक्ष दुपारी १२ वाजेपर्यंत फक्त २९ जागांपर्यतच आघाडी घेऊ शकला आहे. ८१ विधानसभेच्या जागा असलेल्या झारखंडमध्ये सत्तास्थापनेसाठी ४१ हा बहुमताचा जादुई आकडा आहे.

आज दुपारी बारा वाजेपर्यंत काँग्रेस ३९, भाजप २९, एजेएसयूपी ५, जेव्हीएम ४ आणि इतर ४ जागांवर आघाडीवर आहेत. या पूर्वी मतदान सुरू झाल्यापासून सतत झारखंड मुक्ती मोर्चा आघाडी आणि भाजपदरम्यान जोरदार टक्कर पाहायला मिळत होती. जमशेदपूर पूर्व या जागेवर मुख्यमंत्री रघुबर दास आघाडीवर आहेत. तर, दुमका या जागेवरून झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन आघाडीवर आहेत. इतकेच नाही, तर बरहेट विधानसभा जागेवरूनही सोरेन आघाडीवरच आहेत. गेल्या निवडणुकीत सोरेन दोन जागांवरून लढले होते. मात्र त्यांना एकाच जागेवरून विजय मिळवता आला होता. झारखंड राज्यातील एकूण ८१ जागांसाठी १२१५ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. भाजपने जर पुन्हा सत्ता संपादन केली, तर इथे झारखंड राज्याची निर्मिती झाल्यापासून पहिल्यांदाच एखाद्या पक्षाचे सरकार सत्तेवर आल्याची ऐतिहासिक घटना घडणार आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत