‘झी5’ ची मराठी ओरिजिनल वेबसीरिज ‘लिफ्टमन’ प्रदर्शित, भाऊ कदम मुख्य भूमिकेत

मुंबई : रायगड माझा वृत्त 

झी5 (ZEE5) या भारतातील भाषिक कंटेण्टच्या सर्वांत मोठ्या व सर्वसमावेशक मनोरंजन प्लॅटफॉर्मने आज ‘लिफ्टमन’ ही मराठी सिच्युएशनल कॉमेडी वेबसीरिज आपल्या मूळ कलेक्शनमधून प्रदर्शित केली. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामुळे प्रसिद्ध झालेले भालचंद्र (भाऊ) कदम यांची मालिकेत मुख्य भूमिका आहे. काल (ता. 26 जुलै) प्रदर्शित झालेली ही मालिका भाऊंच्या खास शैलीमुळे हास्याची कारंजी फुलवणारी ठरेल.

या मालिकेबद्दल भालचंद्र (भाऊ) कदम म्हणाले, “लिफ्टमनची संकल्पना खूपच वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि झी5 सारखे माध्यमांचे नवीन मार्ग स्वत:ला आपसूक अशा कल्पक फॉरमॅट्सकडे कसे घेऊन जातात हे बघून मी रोमांचित झालो आहे. या मालिकेसह मी वेबच्या जगात शीर्षक भूमिकेद्वारे प्रवेश करत आहे. प्रवेशासाठी याहून अधिक चांगली संकल्पना मला निवडता आली नसती. आज सर्वकाही शब्दश: मोबाईलमुळे एखाद्याच्या हाताच्या बोटांवर आहे आणि अशा परिस्थितीत मागे राहून कसे चालेल?”

झी5 चे बिझनेस प्रमुख मनीष अगरवाल म्हणाले, “मराठी भाषक प्रेक्षकांची मनोरंजनाची जाणीव किती विकसित आहे हे आपल्या रंगभूमी व चित्रपटांच्या समृद्ध वारशातून दिसून येते. विनोद, समृद्ध संकल्पना, आपल्याशा वाटणाऱ्या व्यक्तिरेखा आणि या क्षेत्रातील प्रख्यात कलावंत हे सगळे काही लिफ्टमनमध्ये आहे. मराठी मनोरंजनाच्या क्षेत्रात आज भाऊ कदम हे नाव अनेक अंगांनी विनोदाला समानार्थी म्हणून घेतले जाते. आमच्या सहज येता-जाता बघण्याजोग्या ८-१० मिनिटांच्या छोट्याशा विनोदी वेब मालिकेतील लिफ्टमनची भूमिका त्यांनी निवडली याचा मला आनंद वाटतो.”

२६ जुलैला सुरू झालेली लिफ्टमन ही १० भागांची वेब मालिका आहे. प्रत्येक भाग ८-१० मिनिटांचा असून, प्रेक्षकांना वन लाइनर्स आणि विनोदांनी भरलेल्या गमतीशीर लिफ्टसफरीला तो घेऊन जाईल. झी5 अॅप गूगल प्ले स्टोअरमधून http://bit.ly/zee5आणि आयओएस अॅप स्टोअरवरून http://bit.ly/zee5ios डाउनलोड करता येईल. www.zee5.com वरही ते प्रोग्रेसिव्ह वेब अॅप (पीडब्ल्यूए) म्हणून उपलब्ध आहे. तसेच अॅपल टीव्ही व अॅमेझॉन फायर टीव्ही स्टिकवरही उपलब्ध आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत