झुंज संपली, एम. करूणानिधी यांचं निधन!

चेन्नई : रायगड माझा वृत्त 

तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि डीएमकेचे प्रमुख एम. करूणानिधी यांचं निधन झालंय. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती गंभीर होती. अखेर आज मंगळवारी  त्यांनीकावेरी हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. ते 94 वर्षांचे होते.  करूणानिधी यांना मुत्रपींडाचाही त्रास होता. शनिवारपासून कावेरी हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते.

त्यांच्यावर उपचार करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम कार्यरत असली तरी, मंगळवारी त्यांच्या प्रकृती आणखी खालावली होती. चेन्नईच्या कावेरी हॉस्पिटलमध्ये गेल्या ११ दिवसांपासून भर्ती असलेले डीएमकेचे प्रमुख एम. करुणानिधी यांची प्रकृती जास्त खालावली होती. त्यांचे महत्त्वपूर्ण अवयव सुरू ठेवणे डॉक्टरांसमोर आव्हान ठरले होते. त्यांना लाइफ सपोर्ट सिस्टम (व्हेंटिलेटर)वर ठेवण्यात आले  होते अशी माहिती कावेरी हॉस्पिटलच्या सुत्रांनी दिली  होती.

२८ जुलै रोजी त्यांचा रक्तदाब वाढल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सद्या त्यांचे ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये आहे. मात्र ,त्यांची प्रकृती जास्त खालावली. करुणानिधी यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस करण्यासाठी डीएमकेच्या मुख्यालयाबाहेर आणि कावेरी हॉस्पिटलसमोर डीएमकेच्या कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी झाली. खबरदारीचा उपाय म्हणून पोलीसांचा प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर करूणानिधींच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी राज्यभर प्रार्थना करण्यात येत होती.

आज सकाळपासून अनेक महत्वाच्या नेत्यांनी करूणानिधींच्या प्रकृतीची हॉस्पिटलमध्ये जावून विचारपूस केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एम.के.स्टॅलिन यांना फोन करून करूणानिधींच्या प्रकृतींच्या तब्येतीची विचारपूस केली. तर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, द्रमुक के कार्यकारी अध्यक्ष एम. के. स्टालिन यांनी चेन्नईतल्या हॉस्पिटलमध्ये जावून विचारपूस केली.

दरम्यान संध्याकाळी करूणानिधी यांच्या सर्व कुटूंबियांना हॉस्पिटलमध्ये बोलावण्यात आलं होतं. वय जास्त झाल्याने औषधोपचारही फारसा प्रतिसाद देत नसल्याने डॉक्टरांच्या चिंता वाढल्या होत्या. अखेर संध्याकाळी एम.करूणानिधी यांचं निधन झालं. डाॅक्टरांनी माहिती दिल्यानंतर चेन्नईत शोककळा पसरलीये. त्यांच्या चाहत्यांनी एकच आक्रोश केलाय. खबदरदारी म्हणून चेन्नईत बंदोबस्त वाढवण्यात आलाय.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत