झोपडपट्टी ही राहण्यासाठी नव्हे तर विकण्यासाठी : राज ठाकरे

मुरूड : अमूलकुमार जैन

परप्रांतीय व्यक्तीकडून शासकीय जागेवर ज्या झोपड्या बांधल्या जातात त्या राहण्यासाठी नव्हे तर त्याची विक्री करायची हा धंदा परप्रांतीयांनी चालविला असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अलिबाग येथील रविकिरण हॉटेलमध्ये पत्रकारांशी सवांद साधताना केले. यावेळी राज ठाकरे यांनी नितीन गडकरी हे साखर वाटत तसे पैसे वाटत फिरतात मात्र रस्त्यांची कामे काही होत नसल्याचा टोळा त्यांनी गडकरींना लगावला.

महाराष्ट्रात परप्रांतीय नागरिकांनी मुंबईत अनेक ठिकाणी झोपडपट्टी उभारल्या आहेत. मात्र त्यांना झोपडपट्टी उभारण्यासाठी आपलेच राजकारणी त्यांना साथ देत आहे. कारण त्यांना मताची गरज आहे. आम्ही अनेक वर्षांपासून ह्या परप्रांतीयाविरोधात आवाज उठविला मात्र त्यांना विरोध न होता आम्हालाच विरोध होत राहिला. बांद्रा कुर्ला येथील झोपडपट्टीमधील झोपडीची विक्री ही एक कोटी रुपयांना केली गेली. झोपडी विकून आलेल्या पैशात नवीन घर न घेता परत कुठेतरी झोपडी उभी करायायची हा यांचा गोरखधंदा आहे. त्याचप्रमाणे मागच्यावेळी कोकणात माझी सभा झाली तेव्हा मी आव्हान केले होते कोणी आपली जमीन ही विकू नका मात्र कोणीही माझे ऐकले नाही. त्याच प्रमाणे मी पाकिस्तान मधील कलाकारांना मुंबईत विरोध केला तेव्हा मला पाकिस्तानात नव्हे तर महाराष्ट्र विरोध झाला होता.असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले. पाकीस्‍तानातून केवळ साखरच नाही तर दहशतवादही आयात होतो…..

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्‍यक्ष राज ठाकरे यांच्‍या चार दिवसांच्‍या रायगड जिल्‍हा दौरयांला आजपासून सुरूवात  झाली. कर्जत येथे कार्यालयाचे उदघाटन, कार्यकर्ते पदाधिकारी यांच्‍याशी बंद खोलीत चर्चा केल्‍यानंतर ते अलिबागकडे रवाना झाले.  तेथे त्‍यांनी पत्रकार, स्‍थानिक प्रतिष्‍ठीत नागरीक तसेच पदाधिकारी यांच्‍याशी मुक्‍त संवाद साधला. पत्रकारांशी बोलताना राज यांनी अनेक मुद्यांना स्‍पर्श केला. पाकीस्‍तानमधून आयात साखरेच्‍या मुद्यावर बोलताना राज ठाकरे म्‍हणाले की यापूर्वी पाकीस्‍तानमधून अनेक गोष्‍टी आयात झाल्‍या आहेत. केवळ साखरच नाही तर दहशतवादही आयात झाला आहे. पाकीस्‍तानी कलाकारांना विरोध केला तेव्‍हा भारतातील लोकांनी माझ्यावर टीका केली. पाकीस्‍तानबरोबरचे सर्व प्रकारचे सर्व संबंध तोडले पाहिजेत अशी भूमिका राज यांनी मांडली .

राज ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे  

  • केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी साखर वाटल्यासारखे पैसे वाटतात, काम मात्र होत नाहीत
  • झोपडपट्टयांचा मतांसाठी वापर होतोय म्हणून झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन होत आहे… 
  • कोकणातील नाणार प्रकल्पाविषयक बोलताना जमीन न विकण्याचा सल्ला दिला आहे अन्यथा परप्रांतीय येऊन कोकणचा ह्वास करतील…
  • कोकणात पर्यटन वाढायला हवं, स्थानिकांनी जमिनी विकू नये. परप्रांतीयांचे लोंढे कोकणाकडे वळू लागले आहेत …
  • आत्ता जर जमिनी विकल्या तर कोकणात पुन्हा जमिनी विकत घेणं शक्य नाही. असाही ते म्हणाले
  • नुकताच घडलेल्या औरंगाबाद येथील जातीय दंगलीबाबत त्यांनी हे खापर राजकारण्यांवर फोडलं आणि राजकारण्यांची ही खेळी असल्याचे त्यांनी सांगितले.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत