टँकरमधून तेल गळती; पंधरा दुचाकीस्वार घसरले!

खालापूर : मनोज कळमकर 

सावरोली खारपाङा मार्गावर खालापूर हद्दीत वानिवली गावानजीक टँकरमधून झालेल्या तेलगळतीमुळे पंधरा दुचाकि स्वार घसरून पडल्याची घटना घङली असून वारंवार याठिकाणी तेलगळतीचे प्रकार होत असून अपघाताची टांगती तलवार कायम आहे.

 

 

सावरोली-खारपाडा रस्त्यावर वानिवली गाव ते राॅयल कार्बन कंपनी दरम्यान सावरोलीच्या दिशेने जाताना अवघड चढाव तर दुस-या बाजूला तीव्र स्वरूपाचा उतार आहे..सावरोली-खारपाडा औद्योगिक पट्टा असल्यामुळे टँकर,ट्रेलर,कंटेनर सारखी अवजड वाहतूक या मार्गावरून सतत सुरू असते. मोठी वाहने सावरोलीच्या दिशेने जाताना राॅयल कार्बन कंपनीसमोरील अवघड चढावावर आल्यानंतर अनेकवेळा मोसम कट होतो अशी चालकांची तक्रार आहे.मंगळवारी दुपारी देखील अशाच प्रकारची घटना घङली.रूची सोया कंपनीकडे जाणारा टँकर मधून राॅयल कार्बन कंपनी समोर चढावाला मोठ्या प्रमाणात तेल गळती झाली.

रस्त्यावर सांडलेले तेलाचा अंदाज न आल्यामुळे काहि मिनिटातच एकामागोमाग एक पंधरा दुचाकि या ठिकाणी घसरल्या.काहि जण किरकोळ जखमी देखील झाले.त्यानंतर स्थानिक तरूणानी तातडीने रस्त्याच्या दोन्ही बाजूला ऊभे राहत वाहन चालकांना सावध करण्यास सुरवात केली.पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिल्यानंतर पोलीसानी तातडीने तेल सांङलेल्या ठिकाणी माती आणून टाकली.परंतु बेफिकीर टँकर चालकांवर कारवाई व्हावी अशी मागणी स्थानिक तसेच प्रवासी करित आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत