टंकलेखन परीक्षेचे केंद्र बदलल्याने विद्यार्थी संकटात

टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट संचालकांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

माणगाव : प्रवीण गोरेगांवकर

जुलै 2018 मध्ये घेण्यात येणाऱ्या टंक लेखन परीक्षेचे केंद्र महाड ऐवजी पनवेल केल्याने टंक लेखन परीक्षेला बसलेल्या विद्यार्थिनींना मोठया समस्येला तोंड द्यावे लागत असून विद्यार्थी पुरता संकटात सापडला आहे. अचानक शासनाने घेतलेल्या आडमुठ्या धोरणाचा तीव्र संताप विद्यार्थातून बोलताना व्यक्त होत असून पनवेल हे केंद्र रद्द करून महाड हेच केंद्र विद्यार्थ्यांच्या सोयींनी युक्त आहे. अशी लेखी मागणी वैश्वानर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटचे संचालक श्री. मोने यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासह अनेक मंत्र्यांना निवेदन दिले आहे.

शासकीय यंत्रणा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत गेली 30 वर्षाहून अधिक काळ महाड हे परीक्षेचे केंद्र होते. या तालुक्यालगत असणाऱ्या अन्य तालुक्यांनाही हे केंद्र विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी सोयीचे होते. माणगाव पासून महाड हे परीक्षेचे 30 किमी अंतरावर आहे. या परीक्षा केंद्रावर टायपिंग परीक्षेस संस्था चालकांना टाईपरायटरसह स्टुलस न्यावे लागतात. यापूर्वी या परीक्षा डिसेंबर व मे अशा चालत होत्या. त्यानंतर सन 2012 पासून शासनाने वेळापत्रकच बिघडवून टाकले आहे. हि परीक्षा 2 जुलै 2018 ऐन पावसाळ्यात सुरु होत असून माणगाव तळा संस्थेतून 61 विद्यार्थी बसणार आहेत. माणगाव पनवेल हे अंतर 120 किमी आहे. या परीक्षेस गर्भावती महिला, मुली मोठया प्रमाणात परीक्षेस बसल्या आहेत. त्यांची पनवेल येथे गैरसोय होणार आहे. तरी पनवेल ऐवजी महाड हेच केंद्र ठेवावे अशी मागणी संस्थाचालक व विद्यार्थी करीत आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत