टायटल इन्शुरन्समुळे घरांच्या किंमती महागणार!

मुंबई : रायगड माझा वृत्त 

रेरा अंतर्गत टायटल इन्शुरन्स नावाचा नवा फेरा राज्य सरकारने आणलाय. हा विमा काढणं जमीन मालक आणि विकसक यांना सक्तीचं असणार आहे. त्यामुळे घरांच्या किंमती भडकणार आहेत. ज्या जमिनीवर बांधकाम होणार आहे त्या जमिनीचा विमा म्हणजे टायटल इन्शुरन्स…

महाराष्ट्र पहिलं 

परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठीच देशातही अशा इन्शुरन्स आणण्याचा प्रस्ताव आहे. मात्र याचा भार सामान्य ग्राहकांवर पडेल. टायटल इन्शुरन्सची अंमलबजावणी करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य असेल. टायटल इन्शुरन्स केलं तर प्रती चौरस फूट १५० ते २०० रूपयांनी भाव वाढतील.

टायटल इन्शुरन्स सक्ती 

टायटल इन्शुरन्स करण्यासाठी बिल्डरला इमारत विकास प्रकल्पातील अंदाजे २ ते ३ टक्के रक्कम मोजावी लागेल. फ्लॅट खरेदीत गुंतवलेले पैसे बुडतील ही भीती परदेशी ग्राहकांना वाटते. ती भीती दूर करण्यासाठी टायटल इन्शुरन्स सक्तीचा होणार आहे. मात्र याचे पैसे ग्राहकांच्या खिशातूनच बांधकाम व्यावसायिक काढणार असल्याने घरं महागतील.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत