टिकटॉक अॅपवर बंदी…?

मुंबई : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त

टिकटॉक अॅपवर बंदी घाला, अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. टिकटॉक अॅपमुळं मुलांवर वाईट संस्कार होतात, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. सोशल मीडियावर सध्या सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या टिकटॉकला विरोध होऊ लागला आहे. हीना दरवेश नामक मुंबईतील गृहिणीनं ही याचिका केली आहे.

टिकटॉकमुळे मुलांवर वाईट संस्कार होतात. शिवाय, आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची प्रतिमा मलीन असल्याचंही दरवेश यांनी याचिकेत म्हटलं आहे. मुंबई उच्च न्यायालय याबाबत काय निर्णय घेते, याकडं आता लक्ष लागलं आहे. टिक-टॉक हे एक सोशल मीडिया अॅप्लिकेशन असून या अॅपच्या मदतीनं स्मार्टफोन युजर्स छोटे-छोटे व्हिडिओ बनवून शेअर करू शकतात.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत