टिकटॉक फेम रियाज अली याला भेटण्याची इच्छा असल्याने १४ वर्षीय मुलगी पळून

मुंबई : रायगडा माझा वृत्त 

शिवडी कोळीवाडा परिसरात राहणारी १४ वर्षांची दहावीत शिकणारी मुलगी समाजमाध्यमांवरील टिकटॉक ॲपवर प्रसिद्ध असलेल्या रियाज अली याची चाहती आहे. ती दिवसभर आईच्या मोबाईलवर रियाजचे व्हिडीओ पाहायची. त्यावरून तिचे वडिलांसोबत वारंवार वाद व्हायचे. कुटुंबीयांनी तिच्याकडून मोबाईल काढून घेतला होता. दिल्ली आणि नेपाळमध्ये रियाजचे कार्यक्रम असल्याची माहिती तिला मैत्रिणीने दिली. त्यानुसार तिने रियाजला भेटण्यासाठी घर सोडण्याचा निर्णय घेतला.घरातून पलायन करण्यासाठी या मुलीने एक जोडी कपडे आणि ५००० रुपये जवळ ठेवले होते. १ जूनला पहाटे साडेचार वाजता कुटुंबीय झोपेत असताना ती घराबाहेर पडली.

त्यानंतर तिने कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनस गाठून सकाळी ६.१५ वाजता गोरखपूरकडे रवाना होणारी एक्‍स्प्रेस पकडली. शोध घेऊनही तिचा थांगपत्ता न लागल्यामुळे कुटुंबीयांनी वडाळा पोलिसांकडे धाव घेतली.दरम्यान, वडाळा पोलिसांनी दिलेल्या सूचनेवरून खांडवा येथील रेल्वे सुरक्षा दलातील पोलिसांनी या मुलीला ताब्यात घेऊन बालसुधारगृहात ठेवले. त्यानंतर रविवारी वडाळा पोलिसांनी खांडवा येथे या मुलीचे समुपदेशन  करून तिला पालकांच्या ताब्यात दिले. या मुलीच्या कुटुंबीयांनी वडाळा पोलिसांचे आभार मानले आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत