टिटवाळ्यात रेल्वे रुळालगत सापडले स्त्री जिवंत जातीचे अर्भक

टिटवाळा : रायगड माझा वृत्त 

टिटवाळा नजीकच्या बल्याणी परिसरातील रेल्वे रुळालगत झाडांच्या झुडपात  स्त्री जातीचे एक महिन्याचे जिवंत अर्भक सापडले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की टिटवाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या  रेल्वे रुळापासून काही अंतरावर बल्याणी परिसरात  एका महिन्याचे स्त्री जातीचे जिवंत अर्भक माळरानावर गवतात सापडून आले. काही नागरिकांच्या मदतीने ही घटना समोर आली असुन मानवतेला काळिमा फासणारी घटना बल्याणीत घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सदर अर्भक रेल्वे पोलिस व टिटवाळा पोलिसांनी ताब्यात घेऊन कल्याण येथील रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. याबाबतचा  अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत