टीम इंडियाची झाडाझडती, खेळाडूंच्या बायको-प्रेयसींच्या खर्चाचा तपशील मागवला!

नवी दिल्ली : रायगड माझा वृत्त 

विश्वचषकातील पराभवानंतर टीम इंडियाची झाडाझडती सुरु झाली आहे. विजयानंतर कोट्यवधी रुपयांची बक्षीसं देणारी बीसीसीआय, पराभवानंतर हिशेब मागत आहे. BCCI चं कामकाज पाहणाऱ्या, सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या क्रिकेट प्रशासक समितीने कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांना खेळाडूंच्या पत्नी आणि प्रेयसींच्या दौऱ्याच्या खर्चाची माहिती मागवली आहे.

     

सीओएच्या या निर्णयाने केवळ बीसीसीआयचे अधिकारीच नव्हे तर लोढा समितीही आश्चर्यचकीत आहे. याप्रकरणी आता लोकपाल डी के जैन यांनीच निवृत्त व्हावे, असं सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती आर एम लोढा म्हणालेत. बीसीसीआयने क्रिकेटपटूंना विदेश दौऱ्यावर जाताना पत्नी आणि प्रेयसींना सोबत घेऊन जाण्यास आधी नकार दिला होता. मात्र नंतर काही अटींसह त्यांना परवानगी दिली होती. त्याचाच दाखला देत न्यायमूर्ती लोढांनी म्हणणं मांडलं आहे. कर्णधार, प्रशिक्षक तसंच खेळाडूंनी आपल्या पत्नी आणि प्रेयसींना परदेशी दौऱ्यावर घेऊन जाणं हे हितसंबंधांची बाब आहे. मात्र बीसीसीआयसाठी आपण नवे असे नियम बनवले असल्याचे लोढा म्हणाले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत