टी-२० च्या वर्ल्डकपमध्ये पुढच्या वर्षीपासून नवा संघ सामील होणार

दुबई: महाराष्ट्र News 24 वृत्त 

पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० क्रिकेट विश्वचषकात स्पर्धेत दिग्गज संघांसोबत पापुआ न्यू गिनी हा नवा संघ मैदानात उतरणार आहे. पीएनजी संघाकडून पोकाना आणि वाला यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले. तर, डेमियन राऊ आणि वानुवा यांनी प्रत्येकी दोन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला.

विश्वचषक स्पर्धेत प्रवेश मिळवण्यासाठी नेदरलँडपुढं स्कॉटलँडला १२.३ षटकात हरवण्याचं आव्हान होतं. मात्र, या संघाला ते आव्हान पेलवलं नाही. पात्रता फेरीसाठी झालेल्या लढतीत गिनी संघानं केनियावर ४५ धावांनी विजय मिळवला. स्कॉटलँडनं ८ गड्यांच्या मोबदल्यात १३० धावा केल्या होत्या. नेदरलँडनं हा सामना १७ षटकांत १३१ धावा करून जिंकला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत