ट्विटरकडून अखेर माफीनामा; चूक दुरुस्त करण्यासाठी मागितला अवधी

नवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त

ट्विटरने लेह-लडाखचा भाग चीनमध्ये दाखवणाऱ्या नकाशा बद्दल भारताची लेखी माफी मागितली आहे. ही चूक दुरुस्त करण्यासाठी ट्विटरने 30 नोव्हेंबर पर्यंत अवधी मागितला आहे. संसदीय समितीच्या अध्यक्ष खासदार मिनाक्षी लेखी यांनी याबाबत माहिती दिली.

ट्विटरचे मुख्य प्रायव्हसी ऑफिसर डॅमियन केरिएन यांनी लेखी माफी मागितली आहे. भारतीय नागरिकांच्या सेवेत आणि त्यांचा विश्वास मिळवण्यासाठी आम्ही उत्सुक असल्याचेही ट्विटरने लेखी पत्रात म्हटलंय. तसेच लेह-लडाखला चीनचा भाग दाखवण्याला ट्विटरने तांत्रिक चूक असल्याचं म्हटले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत