ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीवर भाजपचा बहिष्कार

महाराष्ट्र News 24 वृत्त

आज (ता.३०) होऊ घातलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या 10 मंत्रिपदापैकी आठ जण कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. पश्चिम महाराष्ट्रातून कोल्हापूरचे सतेज पाटील आणि सांगलीचे विश्वजित कदम राज्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र विकास महाआघाडी सरकारचा बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तार अखेर आज (ता.३०) होत आहे. विधानसभेच्या प्रांगणात होणा-या कार्यक्रमात निर्वाचित आमदार मंत्री पदाची शपथ घेणार आहेत. मात्र, विधासभेतील विरोधी पक्ष भाजपकडून या शपथविधीवर बहिष्कार घालण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

काँग्रेसकडून अशोक चव्हाण (कॅबिनेट), के.सी. पडवी (कॅबिनेट), विजय वडेट्टीवार (कॅबिनेट), अमित देशमुख (कॅबिनेट), सुनिल केदार (कॅबिनेट), यशोमती ठाकूर (कॅबिनेट), वर्षा गायकवाड (कॅबिनेट), अस्लम शेख (कॅबिनेट), सतेज पाटील (राज्यमंत्री), विश्वजित कदम (राज्यमंत्री) यांना संधी देण्यात आली आहे.

शिवसेनेकडून उदय सामंत, गुलाबराव पाटील, शंभूराजे देसाई, दादा भुसे, संजय राठोड, अब्दुल सत्तार, राजेंद्र पाटील यड्रावकर (शिरोळचे अपक्ष आमदार), शंकरराव गडाख (नेवासाचे अपक्ष आमदार), बच्चू कडू (अचलपूरचे अपक्ष आमदार), संदीपान भुमरे यांना संधी देण्यात आली आहे.

राष्ट्रवादीकडून अजित पवार यांच्यासह दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, राजेश टोपे, अनिल देशमुख, राजेंद्र शिंगणे, नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड या जुन्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांचा पहिल्या टप्प्यात समावेश करण्यात आला आहे. धनंजय मुंडे, बाळासाहेब पाटील, दत्ता भारणे, प्राजक्त तनपुरे यांना पहिल्यांदाच संधी मिळत आहे. माजी मंत्री सुनील तटकरे यांची कन्या आदिती तटकरे यांचा राज्यमंत्री म्हणून समावेश केला जाणार आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत