ठाकरे सरकारनं शेतकऱ्यांचा विश्वासघात केला: देवेंद्र फडणवीस

कोल्हापूर : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त 

ठाकरे सरकारनं शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. अवकाळीग्रस्तांना तातडीची मदत देण्याची गरज असताना त्यांची फसवणूक केल्याचा आरोपही त्यांनी सरकारवर केला आहे. सरकारनं अधिवेशनाची केवळ औपचारिकता पूर्ण केल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.

तसंच कोरेगाव-भिमा प्रकरणात दाखल करण्यात आलेले गुन्हे कायदेशीरच असल्याचंही ते यावेळी म्हणाले. सीएएसंदर्भात विरोधक अफवा पसरवत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. अधिवेशन ही केवळ औपचारिकता म्हणून या सरकारने पार पाडलं. फक्त ६ मंत्री या मंत्रिमंडळात होती. चर्चा झाल्या त्यावर उत्तर देण्यात आली नाही. फक्त ३-३ मिनिटात उत्तर देऊन वेळ मारुन नेली. उद्धव ठाकरे यांनी २५ हजार रुपये हेक्टरी मदत करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. आज शेतकऱ्यांना पैशांची गरज आहे. पण दुर्दैवाने सरकारने एक नवा पैसाही दिला नाही. कर्जमाफीची घोषणा हे यूटर्न होतं. असा आरोप त्यांनी केला आहे.नागरिकत्व कायदा हा कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. हा नागरिकत्व देणारा कायदा आहे. नागरिकत्व घेणारा नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत