ठाकरे सरकार म्हणजे फक्त बनवाबनवी; किरीट सोमय्यांची  टीका 

महाराष्ट्र News 24 वृत्त

आरे कारशेडच्या लढाईत आता किरीट सोमय्या यांनी उडी घेतली आहे. आरेमधील मेट्रो कारशेड संदर्भात ठाकरे सरकारची भूमिका म्हणजे फक्त बनवाबनवी आहे, असे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी एका व्हिडिओद्वारे म्हटले आहे.

Image result for किरीट सोमय्या"

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपासून शिवसेना आणि किरीट सोमय्या यांचे नाते बिनसले आहे. शिवनेमुळेच त्यांना लोकसभेच्या उमेदवारीपासून मुकावे लागले आहे. आता त्यांनी या प्रकरणात शिवसेना सरकारवर टीका करणारा व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे .

सोमय्या म्हणाले, की आरेमधील मेट्रो कारशेड संदर्भात ठाकरे सरकारने नवीन समिती नेमली. समितीला पंधरा दिवस दिले आहेत. या परिस्थितीत वेळेत काम पूर्ण करण्यासाठी सध्याच्या जागेत कोणता पर्याय आहे, हे समितीने सांगायचे आहे. अन्यथा याच ठिकाणी कारशेडचे काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने पर्यावरण समतोल करण्यासाठी काय पावले उचलायची हे सूचवायचे आहे, असे सांगून सोमय्या यांनी फडणवीस सरकारने हे सगळेच केले होते. कोर्टानेही ते मान्य केले आहे. मग ही धूळफेक का?’ असा प्रश्न ठाकरे सरकारला विचारला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत