ठाणे, कल्याण, उल्हासनगरात ‘हातोडा मोहीम’

ठाणे : रायगड माझा वृत्त

सात मजली इमारती असो वा दुकानांचे अतिरिक्त बांधकाम…तर कुठे रस्ते रुंदीकरणाच्या आड येणाऱया टपऱया शुक्रवारी जमीनदोस्त करण्यात आल्या. ठाणे, कल्याण, उल्हासनगर आदी भागांत स्थानिक यंत्रणांनी जोरदार तोडकाम करताना एकूण 60 हून अधिक बांधकामे पाडली. त्यामुळे भकिष्यात रस्त्यांची कामे सुसाट होणार असून बेकायदा बांधकामे पाडून भूमाफियांना दणका देण्यात आला आहे.

कल्याण – 27 गावांतील अनधिकृत बांधकामांवर पालिकेने धडक कारकाई सुरू केली आहे. त्यामुळे बेकायदा टॉवर उभे करणाऱया बिल्डरांचे धाबे दणाणले आहेत. दोन दिवसांत दहा सात माजली बेकायदा इमारती भुईसपाट करण्यात आल्या. ई आणि आय प्रभाग क्षेत्रामधील पिसवली गावात ही कारकाई करण्यात आली. ई प्रभाग क्षेत्रांतर्गत भोपर येथील मदन गुप्ता आणि रतिलाल गुप्ता यांच्या मालकीच्या सहा इमारतींचे अनधिकृत काम चालू होते. या संकुलातील तीन इमारती पाडण्यात आल्या. याशिवाय आय प्रभागातील सात इमारती पाडण्यात आल्या.

उल्हासनगर : जुन्या दुकानांसमोरील अवैध वाढीव बांधकामांवर पालिकेच्या अतिक्रमणकिरोधी पथकाने कारकाई केली. पोलीस बंदोबस्तात कैलास कॉलनी, शक्ती मार्केट, पंजाबी कॉलनी, प्रभाग समिती दोनच्या हद्दीतील अशा 32 काढीक बांधकामांकर अनधिकृत बांधकामकिरोधी पथकाचे प्रमुख गणेश शिंपी यांनी केली. जुन्या दुकानदारांनी समोरच्या जागेवर अतिक्रमण करताना वाढीव बांधकामे उभारल्याच्या तक्रारी आयुक्त अच्युत हांगे यांच्याकडे आल्या होत्या. त्यानुसार प्रभाग समिती चारचे सहाय्यक आयुक्त अजित गोवारी, मुकादम श्यामसिंग आदींनी बांधकामांवर हातोडा चालकला.

ठाणे : रस्ता रुंदीकरण मोहिमेतंर्गत वागळे इस्टेट येथील रोड क्रमांक 16 येथील 20 गाळे तोडण्यात आले. पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली आठकडय़ाभरापासून ठाणे शहरामध्ये रस्ता रुंदीकरण कारवाई जोरात सुरू असून गेले दोन दिवस ही कारवाई वागळे इस्टेट परिसरात सुरू आहे. उपायुक्त (अतिक्रमण) अशोक बुरपल्ले, नगर अभियंता राजन खांडपेकर यांच्या पथकाने पोलीस बंदोबस्तात रस्ता रुंदीकरणाच्या आड येणाऱया गाळ्यांवर कारवाई केल्याने रोड क्रमांक 16 सर्कलचा परिसर मोकळा झाला आहे. त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी येथे होणाऱया वाहतूककोंडीतून सर्वसामान्यांची मुक्तता होणार आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत