ठाणे: गर्भवती महिलेला रुग्णालयात दाखल करून घेण्यास नकार

ठाणे: रायगड माझा वृत्त 

सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा रुग्णांनाही मोठा फटका बसत आहे. कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याचं कारण देत ठाणे सिव्हिल रुग्णालयाने एका गर्भवती महिलेला रुग्णालयात दाखल करून घेण्यास नकार दिल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, कळवा रुग्णालयात या महिलेची सुखरूप प्रसूती झाली असून त्यांची आणि बाळाची प्रकृती उत्तम असल्याचं सांगण्यात आलं.

सुनिता मसमारे असं या महिलेचं नाव आहे. त्या शहापूरच्या तानसा येथे राहतात. पोटात प्रचंड कळा येऊ लागल्याने त्यांना शहापूरच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे सिझेरियनची सुविधा नसल्याने त्यांना आज पहाटे ठाण्यात हलविण्यात आले. मात्र संप असल्याने रुग्णालयात कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याचं कारण देत ठाणे सिव्हिल रुग्णालयाने त्यांना दाखल करून घेण्यास नकार दिला आणि कळवा रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. धक्कादायक म्हणजे प्रचंड कळा येत असतानाही त्यांना रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले नाही. त्यामुळे त्यांना नाईलाजाने कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, कळवा रुग्णालयात मसमारे यांची प्रसूती झाली असून त्यांची आणि बाळाची प्रकृती उत्तम असल्याचं सांगण्यात आलं.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत