ठाणे-पुणे या महामार्गावरील माळशेज घाटात दरड कोसळून वाहतूक पूर्णपणे ठप्प

ठाणे-पुणे या महामार्गावरील माळशेज घाटात दरड कोसळून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याची घटना रात्री अडीच वाजेदरम्यान घडली.

माळशेज घाटात दरड कोसळली; वाहतूक ठप्प

ठाणे : रायगड माझा वृत्त 

माळशेज घाटात आज (मंगळवार, २१ ऑगस्ट) पहाटे दरड कोसळली. त्यामुळे घाटातील वाहतुकीवर त्याचा मोठा परिणाम झाला. सुरूवातीचा काही काळ अडचणीतून मार्ग काढत सुरू असलेली वाहतूक खबरदारीचा उपाय म्हणून पूर्णपणे थांबविण्यात आली आहे.

दरड कोसळल्यामुळे मार्गावर मोठे दगड आणि मातीचा ढिग साचला आहे. महामार्ग अधिकारी कर्मचारी तसेच महसूल कर्मचारी, पोलीस हे घटनास्थळी पोहचले दरड हटविण्याचे काम सुरू झाले आहे. मात्र, घाटातील धुके, वारा आणि ढगाळ वातावरणामुळे कमी प्रकाश असल्याने दरड हटविण्याच्या कार्यात अडथळा येत आहे.

दरम्यान, दरड कोसळून मार्गावर साचलेले दगड, माती हटवून मार्ग लवकरच वाहतुकीसाठी खुला करून देण्यात येईल अशी माहिती, निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांनी दिली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत