‘ठाणे भिवंडी’-‘ठाणे शहापूर’ बसची धडक, २८ जण जखमी

ठाणे : रायगड माझा वृत्त

ठाणे शहरतील सॅटिस पुलावर महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या दोन बसेसच धडक झाल्याने २८ प्रवासी जखमी झाले आहेत. ठाणे-भिवंडी आणि ठाणे शहापूर या दोन बसेसची धडक होऊन हा अपघात झाला. जखमी झालेल्या २८ प्रवाशांवर ठाण्यातील सिव्हिल रूग्णालयात उपचार सुरु आहेत. ठाणे शहरातील सॅटिस पुलावर ही घटना घडली आहे. ठाणे रेल्वे स्थानकाजवळच एसटी बस स्टँड आहे. या बस स्टँडहून ठाणे-भिवंडी, ठाणे-शहापूर, ठाणे-वाडा, ठाणे-पनवेल अशा बसेस सुटतात. या सगळ्या बसेस सॅटिस पुलावरूनच जातात. सॅटिस पुलावर टीएमटी अर्थात ठाणे महापालिकेच्या बसेसचीही गर्दी असते. अशात काही वेळापूर्वी ठाण्याहून भिवंडीला जाणाऱ्या आणि ठाण्याहून शहापूरला जाणाऱ्या बसेसची टक्कर झाली. या घटनेत २८ प्रवासी जखमी झाले आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत