ठाण्यातील ‘सीसीडी’ आगीच्या भक्ष्यस्थानी, जीवितहानी नाही

ठाणे : रायगड माझा वृत्त 

ठाण्यातील 'सीसीडी' आगीच्या भक्ष्यस्थानी, जीवितहानी नाही

ठाण्यात शुक्रवारी सकाळीच आगीची घटना समोर आलीय. ठाणे पश्चिम परिसरातील हरी निवास या भागातील कॅफे कॉफे डे अर्थात सीसीडीच्या एका आऊटलेटला ही आग लागली. आजूबाजूला रहिवासी परिसर असल्यानं या आगीचा मोठा धोका निर्माण झाला होता. परंतु, वेळीच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं… आणि काही वेळातच अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर ताबा मिळवलाय.

अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. आग पसरू नये याची काळजी घेतली जातेय. अद्याप या आगीचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही. सुदैवानं, या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत