ठाण्यातून लाखो रुपये किमतीचा गुटखा जप्त

ठाणे : रायगड माझा वृत्त

गुन्हे शाखा युनिट एकने शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारत लाखो रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे. गुटख्यासह पानमसाला, तंबाखूचा साठा पुढील कारवाईसाठी अन्न आणि औषध प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आला आहे.

शहरातील महागिरीमध्ये अमर सोसायटीमधील शॉप नंबर ६ आणि कनक हाइट्स इमारतीमध्ये तळमजल्यावर गुटखा, पानमसाला, तंबाखू यांचा साठा करून विक्री करण्यात येत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. या कारवाईसाठी गुन्हे शाखेचे दोन पथके तयार करण्यात आली होती आणि गुरुवारी सायंकाळी एकाच वेळी दोन्ही ठिकाणी छापे टाकण्यात आले. यावेळी अफजल याकुब मेमन याच्या ताब्यातून २ लाख ४६ हजार ७२० रुपयांचा गुटखा आणि असलम मोहमद हनीफ मेमन याच्या ताब्यात असलेला १४ लाख २३ हजार १६६ रुपयांचा विविध प्रकारचा गुटखा असा एकूण १६ लाख ६९ हजार ८८६ रुपयांचा गुटखा जप्त केला. या गुटख्याची बाजारात सुमारे ४० ते ५० लाखांना विक्री करण्यात येणार होती. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे, पोलिस निरीक्षक रणवीर बयेस, सहाय्यक पोलिस निरीक्षक अविराज कुराडे, संदीप बागुल यांच्या पथकाने केली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत