ठाण्यात अज्ञात समाजकंटकांनी 18 दुचाकी जाळल्या

ठाणे : रायगड माझा ऑनलाईन 

ठाण्याच्या पाचपाखाडी येथे शिवसेनेच्या शाखेजवळ समाजकंटकांनी 18 दुचाकी जाळल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. आज पहाटे अडीच वाजताच्या सुमारास येथील अल्मेडा रोडवरील हनुमान सोसायटीसमोर उभ्या केलेल्या दुचाकींना ही आग लावण्यात आली. आग लागल्याचे कळताच स्थानिक नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. तसेच काही वेळात घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले आणि आग विझवली. मात्र तोपर्यंत 18 दुचाकी जळून खाक झाल्या होत्या. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी ठाणे पोलिसांकडून दुचाकी पेटविणाऱ्यांचा शोध सुरू आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत