ठाण्यात घोडबंदर रोडवर अपघातात चौघेजण जखमी

रायगड माझा 
ठाण्यात घोडबंदर रोडवर आज सकाळी एका कारला झालेल्या भीषण अपघतात चौघेजण जखमी झाले. जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

आज सकाळी घोडबंदर रोडवरील तत्वज्ञान विद्यापीठाच्या विरुद्ध दिशेला असलेल्या विहंग हॉटेलजवळ मारुती सुझुकी कारला हा अपघात झाला. त्यात मेहताब कुरेशी हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या अपघातात साकीब शेख, फारूख अन्सारी आणि रब्या शेख हे तिघे जखमी झाले असून त्यांच्यावर ज्युपिटर रुग्णालयात उपचार करण्यात आले. हे तिघेही अंधेरी येथील राहणारे आहेत. हा अपघात अत्यंत भीषण होता. अपघातात कारचा संपूर्ण चेंदामेदा झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करायला सुरुवात केली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत