ठाण्यात टीएमटीच्या बसस्टाॅपवर विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

ठाण्यातल्या टीएमटीच्या बस स्टॉपवर बसलेल्या व्यक्तीचा वीजेच्या धक्क्यानं मृत्यू झाल्याची घटना ठाण्यात घडलीये. मोहम्मद डोसा असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.

रायगड माझा वृत्त | ठाणे

ठाण्यात टीएमटीच्या बसस्टाॅपवर विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

 

ठाण्यातल्या टीएमटीच्या बस स्टॉपवर बसलेल्या व्यक्तीचा वीजेच्या धक्क्यानं मृत्यू झाल्याची घटना ठाण्यात घडलीये. मोहम्मद डोसा असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. सुदैवानं दुर्घटनेच्या वेळी बसस्टॉपवर इतर प्रवासी नव्हते. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

मोहम्मद डोसा हा एका कामानिमित्त  ठाण्यात आला होता. यावेळी तो एसटी वर्कशॉपसमोरील टीएमटीच्या बस स्टॉपवर गेला आणि तिथे बस स्टाॅपवर बसताच त्याला विजेचा इतका जोरदार झटका लागला की त्याचा जागीच मृत्यू झाला. बसस्टॉपवर असलेल्या जाहिरातीच्या बोर्डाला जो वीज पुरवठा होतो, त्या केबलमधून विजेचा शाॅक बसस्टॉपवर बसण्यासाठी असलेल्या प्लेटला लागल्याने मोहम्मदचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीये.

ठाण्यातल्या सतत गजबजलेल्या खोपट येथील हा एसटी वर्कशाॅपचा बसस्टाॅप असून या बसस्टाॅपवरून सतत ठाणे महानगरपालिकेच्या टीएमटी सेवेच्या बसेस  येत असतात.

त्यामुळे जर मोहम्मदसोबतच आणखी प्रवासी या बस स्टाॅपवर आले असते तर त्यांचाही विजेचा शाॅक लागून मृत्यू झाला असता. आता विजेची मेन सप्लाय केबल कशी काय तुटून त्या बस स्टाॅपला चिकटली आणि त्यामुळे एवढी मोठी घटना घडून एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागलाय, याची तपासणी चालू आहे.

या घटनेनं ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आलाय. आता पोलीस काय कारवाई करतायेत, ठाणे मनपा आता कोणती कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष्य लागलेय.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत