ठाण्यात रिक्षाचालकाने महिलेचे अपहरण करून जंगलात नेऊन केला बलात्कार

मुंबई : रायगड माझा 

एका 25 वर्षीय महिलेचे अपहरण करून तिच्यावर रिक्षाचालकाने बलात्कार केल्याची घटना ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमध्ये घडली.

सोमवारी रात्री महिला उल्हासनगरातील सराफा दुकानातून घरी जाण्यास निघाली होती. त्याच वेळी मुकेश नामक रिक्षाचालक मागून आला आणि तिला ऑटोत बसवले. नंतर तिला हॉटेलमध्ये नेले आणि खाण्याचा आग्रह केला. मात्र, महिलेने नकार दिला. नंतर तो तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करू लागला. परंतु, महिलेने पोलिसांत जाण्याची धमकी देताच त्याने तिला घरी सोडून देण्याचा प्रस्ताव दिला. नंतर जंगलात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. नंतर महिलेला सोपेगाव भागात सोडून पसार झाला. याप्रकरणी मुकेशला अटक करण्यात आली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत