ठाण्यात 9 बाईक जळून खाक

bike-tourched-thane

ठाणे : रायगड माझा वृत्त 

ठाण्यातील कौशल्य हॉस्पिटलजवळ गुरुवारी पहाटे 3.30 वाजण्याच्या सुमारास पार्क केलेल्या 9 बाईक जळून खाक झाल्या. या घटनेनंतर तात्काळ पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

ठाण्यातील पाचपखाडी अग्निशमन दलापासून काही मिनिटांच्या अंतरावर ही घटना घडली असून या मोटरसायकल जाळल्या की जळण्यात आल्या याचा तपास नौपाडा पोलीस करित आहेत. याआधी गाड्या जाळण्याचे प्रकार पुणे-नाशिक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर घडले आहेत. त्यामुळे हा देखील गाड्या जाळण्याचाच प्रकार तर नाही ना असा संशय निर्माण झाला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत