डंपरआणि रिक्षामध्ये भीषण अपघात; रिक्षाचालक जागीच ठार

दिघी पोर्टच्या बेकायदेशीर अवजड वाहतुकीतून अजून किती जणांचा बळी जाणार? स्थानिकांचा प्रशासनाला आणि दिघी पोर्टला सवाल!

म्हसळा : निकेश कोकचा

दिघी पोर्ट मधून निघणाऱ्या बेकायदेशी अवजड वाहतुकीमुळे म्हसळा माणगाव रस्त्यावरील अपघात मालिका सुरूच असून मंगळवारी असाच एक अपघाताचा प्रकार म्हसळा नजीक असणाऱ्या चांदोरे ग्रामपंचायतीच्या हद्दीत घडला.दिघी पोर्ट मधून बेकायदेशीरपाने कोळश्याची अवजड वाहतूक करणारा ट्रक एका रिक्षाला जाऊन धडकला. धडक एवढी जोरदार होती की समोरील रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत सविस्तरपणे वृत्त असे की, दिघी पोर्ट मधून बेकायदेशीरपणे  क्षमतेपेक्षा अधिक कोळसा वाहून नेह्णारा एमएच ०४ एफजे ३७३७ क्रमांकाचा डम्पर चांदोरे ग्रामपंचायत हद्दीत आल्यानंतर दुसऱ्या बाजूने येणारी एमएच ०६ एएल ५४१० क्रमांकाची खासगी रिक्षा दिसली नाही .अचानक रिक्षा समोर येतानाचे  पाहून चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला.या अपघातामध्ये सुलेमान अमर वालीले रा.मांजरोने ता.माणगाव या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघाताची  माणगाव पोलीस ठाण्यात मोटार अपघात रजिस्टर मध्ये ६९/२०१८ प्रमाणे नोंद करण्यात आली असून डम्पर चालकावर भादवी कलम ३१४ अ,२७९,३३७,३३८,मोटार अपघात कायदा १८४,१३४ प्रमाणे  गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अपघातानंतर डम्पर चालक हा फरार असून या बाबत आधी तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जगताप हे करीत आहेत.
दिघी पोर्ट मधून बेकायदेशीरपणे क्षमतेपेक्षा अधिक वजनाचा लोह व कोळसा भरून नेह्णाऱ्या गाड्यांवर प्रशासन आर्थिक कारणांमुळे मेहरबान असून या गाड्यांचे अपघात झाल्यास संपूर्ण प्रशासन त्यांच्या बचावासाठी येत असल्याचे चित्र सध्या दक्षिण रायगड मध्ये पहावयास मिळत आहे.कलंत्री कडून होणाऱ्या या आर्थिक मेहरबानीमुळे प्रशासन अजून किती स्थानिकांचा बळी घेणार हा प्रश्न आता सर्व सामान्य जनतेला पडला आहे.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत