‘डान्‍सबारसंबधी सरकारची भूमिका मवाळ’: विखे

 

अहमदनगर : रायगड माझा वृत्त

‘डान्‍सबारसंबधी सरकारने आजवर घेतलेली मवाळ भूमिका पाहता डान्‍सबार मालकांची सरकारमधील काही लोकांशी हात मिळवणी असल्‍याचे दिसून येते. तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन, डान्‍सबार बंदीचा निर्णय घेतला होता. पण या निर्णयाबाबत आताचे सरकार गंभीर नसल्‍यामुळेच ही वेळ उद्भवली आहे,’ असा आरोप विधान सभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केला.

कोर्टाच्या आदेशानंतर राज्यात डान्सबार पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यासंबंधी बोलताना विखे म्हणाले, ‘हे राज्य सरकारचे मोठे अपयश असून, याबाबत सरकारकडून करण्यात आलेले दावेही फोल ठरल्याने सरकाची भूमिका प्रामाणिक नव्हती हे स्पष्ट झाले आहे. डान्स बार सुरू होऊ नयेत म्हणून न्यायालयात बाजू मांडण्यास सरकार अपयशी ठरले आहे. मुख्यमंत्री याबाबत अनेक दावे करीत होते, त्यामुळे याची जबाबदारी आता मुख्‍यमंत्र्यांनीच घ्‍यावी.’
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत