डिंपलसोबतच्या ‘त्या’ व्हिडिओवरून केआरकेने सनी देओलशी घेतला पंगा!

एकेकाळी हिंदी चित्रपटसृष्टीत सनी देओल आणि डिंपल कपाडिया यांचे प्रेमप्रकरण प्रचंड गाजले होते. हे दोघे लग्नही करणार होते. मात्र, काही कारणामुळे ते दोघं एकत्र येऊ शकले नाहीत. मात्र, नुकत्याच व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत ते लंडनमध्ये फिरताना दिसले. या व्हिडिओमध्ये ते एकत्र हातात हात घालून गप्पा मारत असल्याचेही दिसत आहे.

सनी आणि डिंपल लंडनला गेले होते. तेथे ते मनमुरादपणे फिरले. एवढेच काय तर एका बसस्टॉपवर दोघेही एकमेकांच्या हातात हात घालून गप्पाही मारताना दिसले. यावेळी एका भारतीय व्यक्तीने त्यांचा व्हिडिओ काढला असून, त्यात डिंपल सिगरेट ओढतानाही दिसते. सोशल मीडियावर व्हायरल झालेले त्यांचे फोटो आणि व्हिडिओ पाहता प्रसारमाध्यमांकडून दोघांच्या प्रेमाची कथा नव्याने रंगविली जात आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीत एखाद्या विषयाची इतकी चर्चा सुरू असताना त्यावर स्वयंघोषित चित्रपट समीक्षक कमाल आर खान म्हणजेच केआरकेने मतप्रदर्शन केले नसते तर नवलंच झाले असते. साहजिकच या सगळ्यावर आपले ‘अमूल्य’ विचार व्यक्त करण्यापासून केआरके स्वत:ला रोखू शकला नाही.

केआरकेने सनी आणि डिंपल यांचा व्हिडिओ शेअर करत सनीला डिवचण्याचा प्रयत्न केला. त्याने लिहिलंय की, ‘सनी देओल आणि डिंपल कपाडिया एकत्र हॉलिडेचा आनंद घेत आहेत. ते खूपच सुंदर कपलप्रमाणे दिसत आहेत.’ केआरकेचे हे ट्विट जरी सौम्य वाटत असले तरी त्याने सनी देओलला यातून टोमणा मारला आहे. आता केआरकेच्या या ट्विटला सनी देओल कशा पद्धतीने उत्तर देणार हे बघणे महत्त्वाचे ठरेल.

सनी देओल यशाच्या शिखरावर असताना त्याच्यासोबत डिंपल, अमृता सिंग आणि रवीन टंडन अशा अनेक अभिनेत्रींची नावे जोडली गेली. पण सनी आणि डिंपलचे प्रेमप्रकरण सर्वाधिक गाजले. डिंपल आणि सनीने ‘मंझील मंझील’, ‘गुनाह’, ‘अर्जुन’ आणि ‘आग का गोला’ या सिनेमात एकत्र काम केले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.